शेती आणि शेती निगडित आवश्यकताची पुर्ती करून जेथे जेथे शेतकरी अडचणीत आहे किंवा जेथे शेतकऱ्यांची पिळवणूक होते ती होऊ नये म्हणून शेतकऱ्याच्या हितासाठी तेथे तेथे आपली संस्था काम करते.
2021 या वर्षात 100 फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून 3 लाख शेतकरी एका प्लॅटफॉर्म वर आणण्याचे आपले उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या अनेक FPO च्या माध्यमातून शेकडो प्रक्रिया उद्योग उभारण्यात येत आहेत.
*आत्मनिर्भर जालना मोहीम* : पहिल्या टप्प्यात जालना जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पुढील उपक्रम कार्यान्वित होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात किसान पॉईंट सुरू करण्यात येत आहे. किसान पॉईंट च्या माध्यमातून पुढील सेवा दिल्या जातात.